समाजात वाचन संस्कृती वाढावी आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी या हेतूने ग्रंथालयांमार्फत लेखक आणि वाचक यांच्यात संवाद साधावा या हेतूने ग्रंथालय नित्रमंडळाने "लेखक आपल्या भेटीला" हा उपक्रम हाती घेतला आहे. वाचकांना भेटण्यास इच्छुक अशा लेखकांची सूची तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर लेखकाच्या भेटींचे कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या ग्रंथालये आणि इतर संस्थांना ही सूची उपलब्ध करून देण्यात येत आहे. लेखक आणि संस्था यांमध्ये समन्वय साधण्याचे काम ग्रंथालय मित्रमंडळ करत आहे. 

यादीतील लेखकांची व्याख्याने आयोजित करू इच्छिणाऱ्या वाचनालये आणि इतर संस्थांनी 'ग्रंथालय मित्र मंडळाच्या' अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आपल्याला हव्या असलेल्या लेखकाचा संपर्क मिळेल. आपण लेखकाशी परस्पर संपर्क करून कार्यक्रम आयोजित करू शकता. ग्रंथालय मित्र मंडळ ही सेवा विनामूल्य पुरवत आहे याची कृपया नोंद घ्यावी.