गिरीश घाटे
श्री गिरीश घाटे धातुशास्त्रात उच्च पदपदवीधर असून गेली तीस वर्षे खाजगी व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. वयाच्या साठ वर्षानंतर श्री घाटे यांनी लेखन क्षेत्रात पदार्पण केले. श्री घाटे यांनी प्रथम 'सांग ना समजेल का?' हा पहिला मराठी कविता संग्रह प्रकाशित केला. त्यानंतर रावसाहेब ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. तत्कालीन हैद्राबाद संस्थानातील प्रसिद्ध समाज सेवक न्या. केशवराव कोरटकर यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे.