डॉ माधवी वैद्य   

डॉ. माधवी वैद्य या एक मराठी साहित्यिक आहेत. मराठीच्या निवृत्त प्राध्यापिका असलेल्या माधवी वैद्य यांनी विपुल लेखन केले आहे. माधवी वैद्य एम.ए.पीएच.डी. आहेत. डॉ. माधवी वैद्य या मार्च २०१३ पासून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष झाल्या. माधवी वैद्य यांनी २५ हून अधिक माहितीपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांतील सहा माहितीपटांना राष्ट्रीय आणि तीन माहितीपटांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.