मिलिंद बोकील 

मिलिंद बोकील हे मराठी लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठी आणि इंग्रजी मधून लेखन केलेले आहे. बारावी नंतर त्यांचे जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी जोडले गेले. त्यांच्या 'छात्र युवा संघर्ष वाहिनीत' ते काम करत होते. मिलिंद बोकील यांची पहिली कथा १९८१ मध्ये किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाली ती पुष्कळ गाजली. मिलिंद बोकील यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. विविध सरकारी समित्यांवर प्रशिक्षण संस्था व बिगर शासकीय संघटनांमध्ये विविध पदावर त्यांनी काम केले आहे