अशोक नायगावकर
श्री अशोक नायगावकर यांनी बी.कॉम. पदवीपर्यंत शिक्षण घेतले. ते मुंबईचे रहिवासी आहेत. शिक्षणानंतर त्यांनी बँक ऑफ बरोडा या बँकेत ३१ वर्षे नोकरी केली आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली. श्री अशोक नायगावकर हे प्रसिद्ध कवी म्हणून साहित्य क्षेत्रात नावारूपाला आले. इ.स. २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४व्या 'कोकण मराठी साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदी अशोक नायगावकर यांची निवड झाली होती. उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे.