राजन गवस 

१९८२ साली शिवाजी विद्यापीठातून MA केल्यानंतर श्री गवस यांनी मौनी विद्यापीठ गारगोटी येथे प्राचार्य म्हणून काम केले. श्री राजन गवस यांनी अनेक सामाजिक लेख आणि कादंबऱ्या प्रकाशित केली आहेत. त्यांच्या 'तणकत' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. राजन गवस यांच्या लेखनाला राज्य शासन, साहित्य अकादमी, महाराष्ट्र फाउंडेशन, लाभसेटवार, भैरू रतन दमाणी इत्यादी विविध संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या तणकट आणि भंडारभोग  या कादंबरीचे कन्नड आणि हिंदी अनुवाद झाले आहेत.