नीरजा  

नीरजा या एक मराठीतील कवयित्री व कथालेखिका आहेत. त्या समीक्षक म.सु. पाटील यांच्या कन्या आहेत. 'ग्रंथाली' आणि 'सानेगुरुजी ट्रस्ट'च्या अनुवाद सुविधा केंदाच्या त्या पदाधिकारी आहेत. ’वेणा’ हा नीरजा यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. नीरजा यांचे "सकाळ सप्तरंग‘मधील "मी कात टाकली‘ हे सदर लोकप्रिय झाले आहे. आधुनिक जीवनजाणिवा त्यांच्या एकूणच लेखनातून व्यक्त होताना दिसतात. .